वीर विश्वास - मालिका (हेरोइक फेथ - सिरीज)
ख्रिस्ताच्या नावास्तव जगभरात दु: ख सोसले जाते आणि या संकटग्रस्त देशांतील बंधू - भगिनींसाठी प्रार्थना करण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. व्हॉईस ऑफ द मार्टीयर्सच्या या आठ लघुपटांमध्ये, तीन खंडांतील छळ करण्यात आलेले ख्रिस्ताचे अनुयायी भयंकर दुःखाच्या दरम्यान त्यांची आशा आणि त्यांच्या विश्वासाच्या कथा सांगतात. यातना करणाऱ्यांच्या समोरच या विश्वास ठेवणाऱ्यांचा स्थिर विश्वास आणि क्षमा आपल्याला उर्वरित जगातील आपल्या भाऊ - बहिणींच्या महान अंतःकरणांची आठवण करून देईल.